Ad will apear here
Next
डॉ. मधुरा कोरान्ने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. मधुरा कोरान्ने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते झाले. या वेळी (डावीकडून) डॉ. मधुरा कोरान्ने, डॉ. गिरीश ओक, अॅड. प्रमोद आडकर व स्नेहल तावरे.

पुणे : स्नेहवर्धन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. मधुरा कोरान्ने लिखित ‘न्यायालय आणि मराठी नाटक’ या विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झाले.  

‘हे एका वेगळ्या विषयावरील पुस्तक आहे. आतापर्यंतच्या अनेक नाटकांमध्ये न्यायालयाची दृश्ये दाखवली जातात आणि तीच आपल्या मनावर ठसतात. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील पंचवीस नाटकांचा अभ्यास करून डॉ. कोरान्ने यांनी हे अभ्यासपूर्ण विवेचन  केले आहे .एका वेगळ्या  विषयाला त्यांनी  स्पर्श केला आहे. डॉ. कोरान्ने या अभिनंदनास पात्र आहेत,’ असे उद्गार सुरेश खरे यांनी या वेळी काढले.

या कार्यक्रमात डॉ. गिरीश ओक यांनी ‘तो मी नव्हेच’ या नाटकातील लखोबा लोखंडे आणि डॉ. मानसी मागीकर यांनी ‘शांतता कोर्ट चालू आहे’मधील लीला बेणारे यांचे स्वगत सादर केले. अॅड. प्रमोद आडकर,  निखिल कोरान्ने यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. केतकी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. स्नेहल तावरे यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWCCB
Similar Posts
डॉ. स्नेहल तावरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन टोकियो : जपानमधील टोयो युनिव्हर्सिटी आणि स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्युटच्या वतीने ‘देश आणि विदेशातील बौद्ध दर्शन आणि बौद्ध संस्कृती यांचे विविधांगी स्वरूप’ या विषयावर १८ व्या आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. टोयो युनिव्हर्सिटीत सहा जून २०१९ रोजी ही परिषद झाली. या परिषदेला
‘आयपार’मध्ये कलाकारांची मांदियाळी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात नाटक हा रसिक प्रेक्षकांच्या जगण्याचा एक भाग बनला आहे. विविध प्रकारच्या सांस्कृतिक महोत्सवांची नेहमीच रेलचेल असलेल्या पुण्यात नाटकांच्या फेस्टिव्हलचा एक नवा ट्रेंड येऊ घातला आहे. याचाच एक भाग असलेला ‘आयपार आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव’ आजपासून (एक नोव्हेंबर) पुण्यात सुरू होतो आहे
‘आई हा मोठा ऊर्जास्रोत’ लेखक, कवी, नाटककार आणि विशेषतः प्रायोगिक रंगभूमीवरील संवेदनशील विषय हाताळणारे, वेगळे विचार मांडणारे नाट्यलेखक म्हणून आशुतोष पोतदार परिचित आहेत. इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केलेले आशुतोष पोतदार पुण्यात फ्लेम युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. एनएसडी, आयआयटी पवई या संस्थांमध्ये ते नाटक, भाषा, साहित्य या विषयांवर मार्गदर्शन करतात
‘वडिलधाऱ्यांचा आदर हीच भारतीय संस्कृतीची शिकवण’ पुणे : ‘वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीत त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. सकारात्मक विचार आणून, त्रासून न जाता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language